Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्वसामान्य माणूस महाविकास आघाडी सोबत - आ. अमित देशमुख

उदगीर (एल.पी.उगीले) लातूर लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या बाजूने सर्वसामान्य माणूस उभा राहत आहे त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय ठरलेलाच आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे सर्वसामान्य माणसाचे उमेदवार आहेत एक अत्यंत उच्चशिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेला समाजसेवक म्हणून डॉक्टर काळगे यांची ओळख आहे त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे तसेच गेल्या दहा वर्षात वाढत चाललेली महागाई बेरोजगारी आणि शेतमालाला आवश्यक असणारा भाव मिळत नसल्याने सर्वच घटक भाजप सरकारवर नाराज असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. असे विचार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात ठीक ठिकाणच्या संवाद बैठकाच्या दरम्यान बोलताना व्यक्त केले याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे बसवराज पाटील नागराळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, जळकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते मनमथआप्पा किडे, काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुका अध्यक्ष मारुतीराव पांडे, काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शिलाताई पाटील, सुवर्ण जगताप यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले की, सर्वधर्मसमभाव ही विचारधारा घेऊन चालणारी काँग्रेस ही एकमेव राजकीय पक्ष आहे. समाजातील सर्वांना योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आजपर्यंत काँग्रेस पक्षाने काम केले आहे त्याची पावती म्हणून मतदान रुपी आशीर्वाद डॉक्टर काळगे यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

या संवाद बैठकीला संबोधन करताना डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी सांगितले की गेल्या 26 वर्षापासून आपण जनतेची सेवा करत आलो आहोत सेवा हा आपला धर्म असून जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते करण्याचा आपला प्रयत्न राहील भविष्यकाळात राजकारणाचा उपयोग फक्त समाजकारणासाठी करण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन जळकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुतीराव पांडे यांनी केले



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.