लातूर (एल. पी. उगीले)
लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
हॉटेल अंजनी सभागृहात झालेल्या या बैठकीस माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आ.शिवराज तोंडचिरकर, प्रदेश सरचिटणीस साजीद भाई, प्रदेश सचिव मदनराव काळे, प्रदेश सचीव प्रा. माधव गंगापुरे, लीगल सेल चे प्रदेश सरचिटणीस ॲड सुरेश पाटील, युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत घार, प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, महीला जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई कदम, युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, युवती जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहाताई मोठे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ, सेवादल जिल्हाध्यक्ष राधाकिशन तेलंग इत्यादींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
