Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काँग्रेसकडून पाखरसांगवी पंचायत समितीतून रामेश्वरजी धुमाळांची प्रबळ दावेदारी

 




लातूर (प्रतिनिधी) मागील-वीस वर्षापासून पाखरसांगवीच्या  सर्वांगीण विकासासाठी स्व. विलासराव देशमुख, दिलीपरावजी देशमुख, आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशनसह अनेक सामाजिक संस्था यांच्यासह आमदार - खासदारांचा निधी आणून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे रामेश्वरजी धूमाळ यांनी काँग्रेसकडून पाखरसांगवी पंचायत समिती गनातून उमेदवारीची मागणी केल्याने त्यांच्या या प्रबळ दावेदारीबद्दल जणतेतून स्वागत केल्या जात आहे. धुमाळ यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल कांग्रेस पक्षाने घेतली पाहिजे, असे मतदारांचे म्हणणे आहे. 

               पाखरसांगवी हे गाव लातूर शहरालगत असून या गावामध्ये 25 वर्षामध्ये नवीन वसाहत झाली असून तेथे रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, गटार आदी मुलभूत सुविध नव्हत्या,  2003 मध्ये पाखरसांगवी परिसरात वास्तव्यास गेले असता प्रचंड नागरी सुविधांची वाणवा होती. या गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे शहरालगत पीण्याचे पाणी जात असलेल्या लिकीज वॉलमधून येथील नागरिक पिण्याच्या पाण्याची तहान भागवत होते. ह्या अडचणी सोडवण्यासाठी रामेश्वरजी धूमाळ यांनी रेल रोको, रस्ता रोको, घंटानाद आंदोलन, सत्याग्रह, उपोषण अशी आंदोलने करून त्या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. एवढ्यावरच न थांबता आमदार, खासदार, मंत्री यांचा विकास निधी आणुन तसेच मुंबई येथील मंत्रालयामध्ये जावून कोट्यावधी रुपयांचा निधी रामेश्वरजी धूमाळ यांनी उपलब्ध करुन घेतला. याउपरही निधी कमी पडत असल्यामुळे, रस्ते निर्मितीसाठी लोकसहभागाची चळवळ उभी करुन, गावकर्‍यांना आदर्श गाव हिवरेबाजारचे प्रणेते पोपटराव पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथे पाखरसांगवी येथील गावकर्‍यांना घेवून जावून ते गाव कसे विकसीत झाले त्याचे ज्वलंत उदाहरण गावकर्‍यांसमोर ठेवले, आणि त्यातुन लोकसहभागाची चळवळ पाखरसांगवीमध्ये राबवून येथील गावकर्‍यांना लोकसहभागाची चळवळ पटवून दिली. त्या गावाप्रमाणेच आपल्या गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने 21 कि.मी. नाला सरळीकरण, खोलीकरण, सकाळ माध्यम समुह, मकरंद आनासपुरे, नाना पाटेकर यांचे नाम फाऊंडेशन, आ. अमित देशमुख यांच्या मदतीमधून गावाचा विकास करण्यासाठी रामेश्वरजी धूमाळ यांनी कोट्यावधींचा निधी आणला. गावकर्‍यांच्या हितासाठी त्यावेळेस जलयुक्त शिवर ची योजना राबवून शासनाचा खुप मोठा निधी गावासाठी आणला. त्यासोबतच लाईटचे पोल, डि.पी. आणण्यासाठी प्रयत्न केले. नवीन वसाहतीमध्ये रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी 153 रस्ते लोकसहभागातून निर्माण केले. राशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्डचे शिबीर भरवून जनतेला हे सर्व कार्ड घरपोच मिळवून दिले. त्यासोबतच श्रावण बाळ योजना, निराधार, विधवा, परित्यक्ता योजना, अपंग योजना, विविध प्रकारची आरोग्य शिबीरं, रक्तदान शिबीरं तसेच अनेक प्रकारच्या शासनाच्या योजना रामेश्वरजी धूमाळ यांनी रामेश्वरजी धुमाळ युवा प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन पाखरसांगवी पंचायत समिती गणातील लोकांना घरपोच उपलब्ध करुन दिल्या.

मागील 25 वर्षांपासून रामेश्वरजी धूमाळ हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून अहोरात्र कार्य करत आहेत. गावामध्ये विविध महापुरुषांचा सार्वजनिक जयंती उत्सव, धार्मिक उत्सव साजरा करण्यामध्ये त्यांची प्रामुख्याची भूमिका राहिली आहे. त्यासोबतच वृक्षारोपण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरोघरी शोषखड्ड्यांचे महत्त्व गावकर्‍यांना पटवून दिले. तसेच गावामध्ये व्याख्याने, शिबीरं, धार्मिक गुरुंचे मोठमोठे कार्यक्रम सातत्याने ते राबवितात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, इफ्तार पार्टी, दिवाळीचे फराळ आदी कार्यक्रम त्यांचे उल्लेखनिय असतात. ते समिक्षा या वृत्तपत्राचे मागील 20 वर्षापासून संपादक आहेत. या दैनिकाच्या माध्यमातुन आजपर्यंत रामेश्वरजी धूमाळ यांनी विविध क्षेत्रातील देशपातळीवर कार्य करत असलेल्या तसेच गावपातळीवरही आपल्या कार्याने ठसा उमटविणार्‍या व्यक्तिंना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. त्यांनी जीवनामध्ये शेतकर्‍यांच्या अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ऊस वाटप, रस वाटप, गुळ वाटप, जेलभरो आंदोलन करुन शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनास भाग पाडले. रामेश्वरजी धूमाळ यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. रामेश्वरजी धूमाळ हे सर्वसामान्य कुटुंबातील असूनही स्वतःच्या घरावर तुळशीपत्रं ठेवून समाजाच्या हिताची कामे ते मागील 25 वर्षापासुन सातत्याने करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. आता होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पाखरसांगवी पंचायत समिती गणातुन सर्वसाधारण पुरुष प्रगवर्गातुन त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागीतली आहे. त्यांच्यासारख्या कार्यक्षम कार्यकर्त्यास काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांचा निश्चतच विजय होईल, आणि पाखरसांगवी पंचायती समिती गणातील गावांचाही सर्वांगीण विकास होईल. रामेश्वरजी धुमाळ यांनी काँग्रेस पक्षाकडे मागीतलेल्या उमेदवारीचे पाखरसांगवी गणातील जनतेतुन त्यांचे स्वागत होत असून त्यांच्या नावाची परिसरात जोरदारपणे चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.