Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सामाजिक भावना जपा - आ.संजय बनसोडे

 




उदगीर (एल पी उगिले): उदगीरच्या जनतेने मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ देत विजयाची माळ गळ्यात घातली आहे. त्याचा सन्मान करून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आपण आहोत याची जाणीव ठेवून सामाजिक जाणीव जपा, असे आवाहन उदगीरचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती शहरातील सर्वसामान्य घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्याची, त्यामुळे सर्व नगरसेवकांनी प्रभागातील सर्वसामान्यांची सेवा करुन लातूर जिल्ह्यात  उदगीर नगर परिषदेचे नाव मोठे करावे. असे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

ते उदगीर शहरातील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात आयोजीत लॉयन्स क्लबस इंटरनॅशनल व लॉयन्स क्लब उदगीर, उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर द्वारा आयोजित उदगीर नगरपरिषद निवडणुक २०२५ मध्ये निवडून आलेल्या नुतन नगराध्यक्षा व सर्व नुतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते.

यावेळी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, नगराध्यक्षा  सौ. स्वाती सचिन हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, प्रदीप बेद्रे, नूतन नगरसेवक सचिन हुडे, माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, ॲड.बालाजी आदेप्पा, सुभाष वाकुडे, शशिकांत पेन्सलवार, ॲड.व्यंकट मोरे, बालाजी सोलापुरे, प्रभाकर पेन्सलवार, ॲड.राजकुमार नावंदर, डाॅ.भाग्यश्री घाळे, डाॅ.शेख अजहर, दिपक बलसुरकर, विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, दशरथ शिंदे, आदीसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, उदगीरच्या विकासासाठी शहरातील जनतेने आपल्या सर्वांवर मोठा विश्वास दाखवून मत रुपी आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता 'उदगीरला स्मार्ट सिटी व सुंदर शहर हरित शहर ' करून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात उदगीर नगर परिषदेचा नावलौकिक नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी करावा. अशी अपेक्षा व्यक्त करून उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून एकत्रितपणे काम करा असे आवाहन केले.

यावेळी उदगीर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.