उदगीर (प्रतिनिधी)
प्रसिद्ध साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी ता. उदगीर येथील
सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा हरि प्रिया मल्टीपर्पज हॉल माधवनगर मिरज रोड चाणक्य चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून खा. विशालदादा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवटी, माजी आ. विक्रम दादा सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यांच्या हस्ते वर्षाराणी मुस्कावाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वर्षाराणी मुस्कावाड यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, आशुतोष पाटील गोजेगावकर, मुख्याध्यापक बालाजी मोरे, मनोज पाटील, प्रा धनराज बंडे, प्रा. कुमार बंडे, साहित्यिका अनिता येलमटे, अंबिका पारसेवार, नीता मोरे व इतर मान्यवरांनी केले आहे.
