उदगीर (प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय ब- विभाग क्रॉस कंट्री (पुरुष) स्पर्धा दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेत ब विभागातील 15 संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, ब- विभाग सचिव डॉ. तातेराव केंद्रे, निवड समिती सदस्य प्रा. डॉ. सचिन चामले, प्रा. डॉ. अनिल इंगोले, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल वैयक्तिक प्रथम- विठ्ठल राठोड (महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर) द्वितीय- हनुमंत पवार (स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद) तृतीय- संविधान ढवळे (महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर) तर सांघिक विजेतेपद अनुक्रमे प्रथम - महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, द्वितीय - श्री शिवाजी महाविद्यालय कंधार, तृतीय - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर याप्रमाणे यश संपादन केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व पंच म्हणून प्रा. डॉ. डी.आर मुंडे, प्रा. डॉ. नारायण जायभाये, प्रा. डॉ. जयदीप कहाळेकर, प्रा. डॉ. दिलीप काळे, प्रा. डॉ. खुशाल वाघमारे, सतीश पाटील, संतोष कोल्हे, तुळशीदास पोतने, रमेश सूर्यवंशी, सचिन चौधरी, वीरसागर काळे, साईनाथ कांबळे, रोहन एनाडले, जनक घोगरे, सोनल उदबळे, प्रा. शेख रमजू, प्रताप भालेराव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर तर प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी केले.
