Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सी आर ई प्रोग्रॅमची पुनर्वसन तज्ञ साठी आवश्यकता

 




उदगीर( एल .पी. उगीले)

दिव्यांग क्षेत्रात कार्यरत विशेष शिक्षक आणि इतर पुनर्वसन विषयक तज्ञ यांचे तीन दिवसीय भारतीय पुनर्वस परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना दिव्यांगाच्या अर्थपूर्ण सर्वांगीण समावेशनाची नितांत आवश्यकता आहे. असे प्रतपादन प्रा. जगन मुदगडे यांनी व्यक्त केले.

भारतीय पुनर्वसन परिषद दिल्ली व के डी जाधव मूकबधिर विद्यालय पोफळी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रवर्गातील सर्व प्रकारातील विशेष शिक्षणासाठी तीन दिवसीय सि आर इ  प्रोग्राम चे आयोजन संत तुकाराम विधी महाविद्यालय करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये सर्वसमावेशिक शिक्षण या विषयावर चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन संत तुकाराम विधी महाविद्यालयाच्या प्रा. ॲड. सौ दीप्ती नावंदर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निफाड सिकंदराबादचे माजी सदस्य तथा लातूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र चे समन्वयक बसवराज पैके  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अजय कांबळे, प्रा. ॲड. जागीरदार, न्यू मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज उदगीर च्या प्रा. मीना केंद्रे, प्रा. गायकवाड ओम प्रकाश तानशेट्टी, श्रीधर सावळे, सचिन जगताप, बलभीम राठोड, अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी जीवन विकास मतिमंद कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापकीय अधीक्षक राजा पटेल अब्दुल मलिक, प्रा जगन मुदगडे, प्रा. सतीश कल्पे,प्रा. माधव जाधव यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना पैके म्हणाले की, या प्रशिक्षणातून नवनवीन प्रकारच्या ज्या संकल्पना जगासमोर येत असतात, त्या संकल्पनेचा अभ्यास तीनदिवसात घेऊन आपापल्या दिव्यांग क्षेत्रातील शाळेत व समाजात त्याचा उपयोग करावा. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला . यावेळी सर्व प्रमुख पाहुण्याचे शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश कल्पे यांनी केले. या प्रशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातूनही विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.