Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भरत भाऊ चामले यांचा सत्कार संपन्न

 


उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते भरत भाऊ चामले यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीवर राज्य संघटक सचिव पदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन भोसले, जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस इब्राहिम शेख, विद्यार्थी आघाडीचे मुख्य प्रदेश सरचिटणीस विशाल विहिरे, रेड्डी (येलम) संघटनेचे उदगीर तालुकाध्यक्ष रामकिशन नादरगे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरत चामले म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दादाच्या आशीर्वादाने यापूर्वी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघावर मराठवाड्याचा संचालक म्हणून बिनविरोध माझी निवड झाली होती. सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचा माझा अनुभव लक्षात घेऊन दादांनी मला ती संधी दिली होती. आता दुसऱ्यांदा उदगीर परिसरातील मतदारांनी खरेदी विक्री संघावर पुन्हा माझ्या पॅनलला प्रचंड बहुमताने बिनविरोध निवडून दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आणि मतदारांचेही आभार त्यांनी व्यक्त केले. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू. पक्ष संघटनेचे काम करत असताना पक्षाच्या ध्येयधोरणाच्या अधीन राहून माझी सर्व टीम काम करेल, असा विश्वास चांगले यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.