उदगीर (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना कर्नल सचिन रंडाळे म्हणाले, विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी नियमित अभ्यास, कठोर मेहनत व आत्मविश्वासाची गरज आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस बसवराज म. पाटील नागराळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सचिन रंडाळे, प्राचार्य वसंत कुलकर्णी, विभाग प्रमुख संतोष चामले, प्रा. नितीन पाटील , शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड हे उपस्थित होते.
पूढे बोलताना कर्नल सचिन रंडाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमित वर्तमान पत्र वाचन करावे. एसएसबी व एनडीए याची तयारी इ. ६ वी पासून करावी. विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यात अधिकारी पदावर जाऊन देशाची सेवा करावी. एसएसबीची तयारी कशी करावी, याचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय समारोपात संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले, कर्नल सचिन रंडाळे यांनी देशसेवा करताना सलग तीन पदक मिळवले ही बाब खूप अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी एनडीए मध्ये जाण्यासाठी नियमित अभ्यास करावे.इंग्रजी बोलण्याची तयारी करावी. सैनिक हा देशाची सेवा करतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी सलामी शस्त्राच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे कर्नल सचिन रंडाळे यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा अल्प परिचय प्रा. नितीन पाटील यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसं
चालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख संतोष चामले यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, सुधीर गायकवाड, नागेश पंगू, प्रा. नितीन पाटील हे विनायक करेवाड व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

