उदगीर (एल पी उगीले) येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच 53 महाराष्ट्र बटालियन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर योजने संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे उपस्थित होते. 53 बटालियनचे लातूरचे नायब सुभेदार बाजीराव पाटील हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर हवालदार शिवाजी होळकर व महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व सिनेट सदस्य डॉ. व्ही. एम. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी सुभेदार बाजीराव पाटील यांनी अग्नीवीर योजनेचे स्वरूप, उद्देश, भरती प्रक्रिया, उमेदवाराची पात्रता, फॉर्म भरण्याची पद्धती, परीक्षेचे स्वरूप, नोकरीचा कालावधी, वेतन व भत्ते इत्यादी बाबत सखोल व सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व एकतेचे महत्व सांगितले. डॉ. आर. एम. मांजरे यांनी एनसीसीचा विद्यार्थी हा महाविद्यालयाच्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असून तो राष्ट्राची खरी शक्ती असल्याचे स्पष्ट केले व आपल्या ध्येयासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी केले. त्यांना सीनियर अंडर ऑफिसर मोहिनी पांचाळ, ज्युनिअर अंडर ऑफिसर अभिषेक कोयले, शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद पाटील व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी बालाजी मुस्कावाड, रवीकिरण वाघ, तेलंग सर यांच्यासोबत वेगवेगळ्या महाविद्यालयाचे व विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
