उदगीर (एल .पी .उगीले) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा शुक्रवार दि. १८ जुलै रोजी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात येथील श्री शंकरलिंग महाराज मठ संस्थांनाचे मठाधीश ह.भ.प. सुखदेव स्वामी महाराज यांचा उदगीर भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
शुक्रवारी बिदर रोडवरील मोरया मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणुन प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष म्हणुन मोतीलाल डोईजोडे व सचिव म्हणुन विक्रम हलकीकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण होणार आहे. यावेळी ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे २०२७-२८ चे प्रांतपाल क्षितिज झावरे, विद्यमान सहा. प्रांतपाल चंद्रशेखर मुळे, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रतिनिधी केतकी कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन विजयकुमार पारसेवार यांनी केले आहे.
