जि.प.च्या मराठी माध्यमाच्या ऐकाच शाळेतील या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
यामध्ये जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं. १ या शाळेतील ऐकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड होण्याबरोबरच या अगोदर याच तिघांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असून त्यांच्या या यशामागे प्रशालेतील प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे हे आहेत. मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे पालकमंत्री सामंत, आ. किरण सामंत, कोकण विभागीय परीक्षा मंडळ सहसचिव प्रेरणा शिंदे, रत्नागिरी तालुका पं. स.गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर आदींनी अभिनंदन केले आहे.
