उदगीर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्याचे नव्याने रुजु झालेले पोलीस अधीक्षक मंगेशजी चव्हाण यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, लातूर तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी लातूर जिल्हाभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेतली व पोलीस पाटलांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. या वेळी पोलीस पाटील संघटने तर्फे लातूर जिल्ह्यातील महिला पोलीस पाटील यांचे मानधनातून दर महा 200 रुपये भत्ता कपात केला जात आहे, पण महिलाना पंचवीस हजार रुपया पर्यत व्यवसाय करातून सूट असल्या कारणाने पोलीस पाटील संघटने तर्फे महिला पोलीस पाटील यांचे दर महा व्यवसाय कर कपात होऊ नये, म्हणून निवेदन देण्यात आले. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी संबंधित कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तात्काळ यावर कार्यवाही करून व्यवसाय कर कपात न करण्या करिता आदेश काढण्यासाठी सांगितले.
त्या नंतर पोलीस पाटील संघटने तर्फे एल सी बी चे वरिष्ट पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व ओ. एस.वाघमारे यांचा पण सत्कार करण्यात आला , त्या वेळी एल सी बी चे पोलीस निरीक्षक बावकर यांनी जिल्हा भरातून आलेल्या पोलीस पाटील यांची सभागृहा मध्ये बैठक घेतली व सर्व पोलीस पाटील यांच्या कडून जिल्हाभरातील गोपनीय माहिती विचारून घेतली व मार्गदर्शन केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब सपाटे पाटील, मराठवाडा संघटक दत्ता पाटील,जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष स्वरूपानणंद कदम पाटील, कार्यकारी अध्यक्ष संपतरावं डोंगरे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नरले पाटील, जिल्हा सचिव विठल फेसाटे,सहसचिव कांचे पाटील, महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई बिरादार,औसा तालुका अध्यक्ष सुंदरराव गोरे,उदगीर तालुका अध्यक्ष धनराज तौर पाटील, अहमदपूर तालुका अध्यक्ष संग्रामजी बरूरे, चाकूर तालुका अध्यक्ष शेळके पाटील, लातूर तालुका अध्यक्ष गुणाले पाटील,जळकोट तालुका अध्यक्ष सोमेश्वर परगे पाटील, निलंगा तालुका अध्यक्ष संतोष नरहरे,शिरूर अनंतपाळ अध्यक्ष बापूराव बिरादार, व सर्व जिल्हा भरातून जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी तसेच आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
