Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सूरज चव्हाणांसह ११ जणांवर गुन्हा; दोघांना घेतले ताब्यातसूरज चव्हाणांसह ११ जणांवर गुन्हा; दोघांना घेतले ताब्यात

 


लातूर (प्रतिनिधी)/लातूरच्या शासकीय विश्रामधामात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांना सूट नं. १ मध्ये मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांचे इतर १० सहकारी असे एकूण ११ जणांविरूद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पैकी दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.

विश्रामगृह येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  विजयकुमार घाडगे व त्यांचे सहकारी हे विधानपरिषदेत कामकाजाच्या वेळी मोबाईलवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छावा कार्यकर्त्यांनी पत्ते आणून ते  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना द्यावे, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे राषट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन दिले.


त्यानंतर ते प्रेस हॉलच्या बाहेर पडत असताना आमच्या नेत्याविरूद्ध अपशब्द वापरले म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहका-यांनी छावाचे विजयकुमार घाडगे यांना सूट नं. १ मध्ये नेऊन बेदम मारहाण केली. सदरील घटना दि. २० जुलै रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता मारहाण झाली तर सोमवारी पहाटे ३.५१ वाजता लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, रा. शिरूर अनंतपाळ, लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजीत सगरे पाटील, सिद्दीक मुल्ला, रवि धुमाळ, राजू बरगे सर्व रा. लातूर अशा अकरा जणांविरूद्ध लाथाबुक्क्यांनी, हातातील काड्यांनी, फायटरने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विजयकुमार घाडगे पाटील यांच्या फिर्यादीवरून भा. न्या. स. कलम ११८ (१), ११५(२) ३५१(२), १८९(२), १९२(२० १९० व सहकलम १३५ मुंबई पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्या आला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड हे अधिक तपास करीत आहेत. सदरील गुन्ह्यातील आरोपीतांपैकी लाला सुरवसे व अभिजित सगरे या दोघांना पोलीसांनी सोमवारी सकाळीच ताब्यात घेतल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.