देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांच्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना रजि.२८४० देवणी तालुकासंघटनेची बैठक वलांडी येथील श्री खंडोबा मंदिर येथे शुक्रवारी (ता.७) आयोजित करण्यात आली होती.सदरील बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी संगणक परिचालक रेवण बडुरे होते.बैठकीच्या प्रास्ताविकात आनंद अंकुलगे यांनी संघटनेचे मार्गदर्शक तत्वे,ध्येय धोरणे मांडली.तसेच बैठकीत सर्वानुमते देवणी तालुकाध्यक्ष पदी माधव उमाकांत कोरे तर सचिवपदी मोहसीन मुलतानीखान पठाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.नूतन अध्यक्ष माधव कोरे यांनी संघटनेचे नियम अटी पाळून पुढील काळात सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.उर्वरित तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.-नूतन कार्यकारणी अध्यक्ष माधव उमाकांत कोरे,उपाध्यक्ष नवनाथ नागनाथस्वामी ,उपाध्यक्ष( म)विद्यावती काळगापुरे,सचिव पठाण मोहसीन मुलतानीखान पठाण,कार्याध्यक्ष - आनंद बालाजी अंकुलगे ,सहसचिव - दत्ता राजकुमार काकनाळे ,कोषाध्यक्ष अमोल धनराज रोट्टे,संघटक अभिषेक संजय कांबळे,
संपर्क प्रमुख देशमुख राजकुमार,
सहसंपर्क प्रमूख श्रंगारे राजेश्री ,
तांत्रिक प्रमुख मचकुरी मोबीन ,
तालुका मिडिया प्रमुख बाळकृष्ण कुंभार.
