मुख्यमंत्री योजना दूत या योजनेत निवड प्रेरक प्रेरिकांची निवड करा - लक्ष्मण रणदिवे
महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका संघ भगवानराव देशमुख संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विविध मागण्याची दिले निवेदन,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
लातुर येथे विलासराव देशमुख स्मारक या ठिकाणी साक्षर भारत प्रेरक प्रेरिका यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत शिक्षण अधिकारी योजना यांना निवेदन देणे, तसेच नवीन तालुकाध्यक्ष देडे धनराज रामकृष्ण लातूर तालुकाध्यक्ष, उदगीर तालुकाध्यक्ष कावेरी उमाजी नितंगे,उपाध्यक्ष जयश्री भिम जाधव, देवणी तालुकाध्यक्ष शोभा अरुण बिरादार,यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तसेच उद्धव दुवे यांनी कवितेचा असलेला संग्रह महाराष्ट्रात पहिला आला संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद लातूर महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका संघाच्या वतीने थकीत मानधन विविध मागणीचे दिले निवेदन,मा,डॉ महेश पालकर साहेब शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे केली विविध मागण्याचे निवेदन सुद्धा दखल घेतली नाही म्हणून लातूर जिल्ह्याची बैठक बोलून शिक्षण अधिकारी योजना यांना निवेदन देऊन आमचे म्हणणे कळवा अशी प्रेरक प्रेरकाच्या वतीने करण्यात आली ,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ट्रेनी शिक्षक म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर एका प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार असल्याचे आदेश पारीत झालेले आहेत. ही निवड प्रक्रिया राबविताना साक्षर भारत योजनेअंतर्गत सन २०१२ ते २०१८ या कालावधीत ज्या प्रेरकांनी अत्यल्प मानधनावर काम केले त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ त्यांना मिळणारे तुटपूंजे मानधन थकीत ठेवून आणलेली आहे. मागील १९ महिन्याचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, मुख्यमंत्री योजना दूत प्रेरक प्रेरिका यांना समाविष्ट करून घ्यावे, नवीन योजनेमध्ये ट्रेनी शिक्षक, नवभारत साक्षरता, शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत घेणे, अंशकालीन दर्जा देण्यात यावे, शासनाचे जे कामे असतील ते प्रेरक प्रेरिका यांना त्वरित देण्यात यावे,आशाचे निवेदन देण्यात आले थकित मानधन अध्यापही प्रेरकांना देण्यात आलेले नाही. या बाबत वेळोवेळी शासन दरबारी लेखी निवेदने, आंदोलने, मोर्चे या माध्यमातून पाठपुरावा केला गेला परंतु त्यांचे मानधन तर दिलेच नाही किंवा त्यांच्या हाताला काम देखील दिलेले नाही. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये २ प्रेरकांनी ६ वर्षे निरक्षरांना साक्षर करण्याचे काम केले. तसेच बी.एल.ओ. चे, जनधन योजना, स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजनेमध्ये प्रेरकांनी काम केलेले आहे. त्यांना अनुभव असल्यामुळे, मुख्यमंत्री दूत योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षकांच्या नियुक्त्त्या करताना अनुभवसिध्द प्रेरकांना प्राधान्यक्रम देण्यात यावा. तरी विनंती की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड प्रक्रिया राबविताना साक्षर भारत योजनेअंतर्गत काम केलेल्या प्रेरकांना प्राधान्य देवून त्यांच्या हाताला काम व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली काढावा असे लेखी निवेदन शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कार्यालय येथे देण्यात आले यावेळी उपस्थित, निवेदक अर्जुने भुजंग जिल्हाध्यक्ष लातूर, लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्हा संघटक, लातूर तालुकाध्यक्ष देडे धनराज, निलंगा प्रकाश घोरपडे निलंगा तालुकाध्यक्ष,रामदास कदम जळकोट तालुकाध्यक्ष, शोभा बिरादार तालुकाध्यक्ष,कावेरी नितंगे उदगिर तालुकाध्यक्ष,उपाध्यक्ष जयश्री जाधव, चाकूर तालुकाध्यक्ष उद्धव दुवे, इंगळे गोविंद, निलंगा उपाध्यक्ष उर्मिला काळे, माने मीना, सूर्यवंशी साहेबराव, सोनकांबळे शिवाजी, बिरादार सलीम, गायकवाड हुशेन,गुबनर प्रल्हाद, मधुकर अजगरे, प्रदीप गवळी, साळुंके मोहनराव,माने गुंडू, शिंदे निशिकांत,एकनाथ जाधव, सुधाकर कांबळे आदींची उपस्थिती होती,
