Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोलीस निरीक्षक माणिकराव डोके पोलीस प्रशासनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व



 देवणी प्रतिनिधी  लक्ष्मण रणदिवे 


देवणी  पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही म्हणून पोलीस प्रशासना विषयी असलेला गैरसमज पुसून टाकून लोकाभिमुख पोलीस प्रशासन निर्माण करून लोकांना चांगल्या प्रकारच्या सोई सुविधा कशा देता येतील व सर्वसामान्य लोकांवर अन्याय होणार नाही यासाठी लोकांत मिळून मिसळून त्यांच्या अड अडचणी सोडविण्याचा चोवीस तास प्रयत्न करणारे देवणीचे पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे पोलीस प्रशासनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत देवणी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक माणिकराव डोके रुजू झाल्यापासून देवणी तालुक्यातील घडणाऱ्या घटना अपवाद वगळता झोरोवर आल्या आहेत माणुसकीचे श्रोत असणारे माणिकराव डोके साहेब आजपर्यंत विविध प्रकारच्या गुन्हेगारीकडे सामाजिक दृष्टीकोनातून पहिले आहे कोणीही आरोपी किंवा फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये आला की सदर प्रकरणाची एक बाजू त्यांनी कधी पहिली नाही दोघांची बाजू ऐकून घेऊन त्यांना कागदावर न घेता दोघांना समंजसपणे समजावून सांगून त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यात पोलीस निरीक्षक डोके साहेबाना यश आले आहे त्यामुळे देवणी तालुक्यात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे असेच वातावरण त्यांनी निर्माण केले आहे त्यामुळं देवणी तालुक्यात कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही निर्माण झाला नाही डोके साहेबांनी निर्माण होऊ दिला नाही हे माणिकराव डोके यांच्या कार्याचे फलीत म्हणावे लागेल पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत आपली पोलीस प्रशासकीय सेवा बजावली आहे देश भरात मुंबई पोलीस यांची खूप मोठी ख्याती आहे जग भरातील गँगवारउदा. हाजी मस्तान मिर्झा , दाऊद इब्राहिम, अरुण गवळी अनिल परब, माया डोळस, छोटा शकील सारख्या गँगचे समर्थक अनेक उपद्रवी कारवाया मुंबईत शहरात करीत असतात मुंबई पोलीस प्रशासनाला सातत्याने तोंड द्यावे लागत असते तेव्हा मुबंई पोलीस नेहमी सतर्क असतात त्या ठिकाणी माणिकराव डोके साहेबांनी सेवा बजावली आहे त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला समोर जाताना कसलीच भीती न बाळगता निसंकोचपणे सामोरे जात असतात त्यात काही शंका नाही मुंबई पुणे सारख्या नामांकित शहरात सेवा बाजावाल्यामुळे  या सेवेदरम्यान आलेला प्रचंड मोठा अनुभव गाढा अभ्यास व अभ्यासू वृत्ती सामाजिक शैक्षणिक बांधिलकी. समोरील सर्वसामान्य लोकांची मानसिक स्थिती ओळखण्याची आत्मशक्ती सर्वगुण संपन्नता आणि आपले ध्येय स्पष्ट असल्यामुळे मनमिळाऊ स्वभाव टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट हा स्वभाव आकाशी उंच्च भरारी घेणारा आहे त्यात तीळ मात्र शंका नाही देवणी म्हण्टल की नको रे बाबा म्हणारे अधिकारी बरेच आहेत  परंतु देवणीत सेवा बजावल्यानंतर शासकीय सेवेसाठी देवणीसारखे ठिकाण नाही असे म्हणारे अधिकारी आम्ही पहिले आहेत येथे राजकीय कसलाच हस्तक्षेप केला जात नाही नेहमी चांगले कार्य करणाऱ्या अधिकारी यांना डिस्टरब केला जात नाही त्यांचे कौतुकही करण्यासाठी देवणीकर कमी करीत नाहीत नक्कीच पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांचे नेत्रादीपक कार्य कौतुकास्पद आहे देवणी तालुका सीमावर्ती तालुका असल्याने नेहमी सतर्कचं राहावे लागते त्यामुळे देवणी तालुक्यात असलेला पोलीस फोर्स अगदी बोटावर मोजण्या इतका आहे सार्वजनिक कार्यक्रम जेव्हा जेव्हा असतात तेव्हा डोके साहेबांनी आपल्या डोक्याचा वापर करून शांतता व सुव्यस्थानात कार्यक्रम पार पाडले आहेत आपली यंत्रणा कितीही कमी असली तरी नियोजनात कधी कमी पडत नाहीत यात शंकाच निर्माण होतं नाही अश्या कर्तबगार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे त्यांची आशिचं उत्तरोउत्तर प्रगती होहो हीच सदिच्छा माणिकराव डोके साहेबाना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस  विनायक कांबळे, गणेश बुजारे, शिंदे,पत्रकार गिरधर गायकवाड, अनिल कांबळे, लक्ष्मण रणदिवे, लक्ष्मण म्हेत्रे आदींची उपस्थिती होती

[1:57 PM, 9/21/2024] Ugile Sir: 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.