Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काँग्रेस नेत्या उषा कांबळे शेतकऱ्यांच्या बांधावर, उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांवर निसर्ग कोपला



उदगीर (एल.पी. उगिले)

उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राधान्याने जळकोट परिसरातील दहा गावात अतिवृष्टी होऊन हजारो हेक्टर्स मधील पीक वाहून गेले आहेत. इतकेच नाही तर काही ठिकाणी पिकासोबत शेतीची माती ही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे शेतकऱ्यांचे दुःख पाहून काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उदगीर, जळकोट तालुक्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. जवळपास 4000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे. संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून टाकणारी ही दुर्दैवी घटना आहे. प्राधान्याने सोरगा, होकरणा, उमरदरा, केकतसिंदगी, वडगाव, वांजरवाडा, उमरगा रेतू, शेलदरा ,चेरा इत्यादी गावांमध्ये तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती होऊन शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

या भागातील प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. शासकीय यंत्रणेतील सहाय्यक कार्यकारी अधिकारी (नरेगा), सुधाकर बुक्के, यांनीही पाणी केली. तसेच कृषी सहाय्यक खलसे, कृषी सहाय्यक अर्जुन रेड्डी, या परिसरातील तलाठी यांनी पाहणी करून पंचनामे करावेत अशा पद्धतीची मागणी होत असतानाच यंत्रणा बांधावर पोहोचली आहे. या यंत्रणे सोबतच काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा उदगीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार सौ. उषा कांबळे यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. बांधावरची परिस्थिती लातूरचे खा. डॉ. शिवाजीराव काळगे, लातूरचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांना संपर्क साधून शेतकऱ्यांशी संवाद साधून दिला. या दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना बोलून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सूचना दिल्या, आणि शेतकऱ्यांना धीर दिला.

 याप्रसंगी उषा कांबळे यांच्यासोबत जळकोट तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, शहर अध्यक्ष महेश धूळशेट्टे, राहुल शिवनगे, चेअरमन रामा परीट, चेअरमन भुरे, सरपंच दामोदर बोडके, चेअरमन माधव लांडगे, सरपंच बालाजी गुट्टे, चेअरमन धोंडीबा बंडे, सरपंच मंगेश गोरे, चेअरमन शंकर आगलावे, संदीप बिरादार पाटोदेकर, सरपंच सुधाकर सोनकांबळे, दत्ता पवार, डॉ. गोविंदराव सोनकांबळे, लक्ष्मण तगडपल्ले यांच्यासह या परिसरातील सरपंच आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोठ्या संख्येने बांधावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.