देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
धनेगाव येथे रणदिवे बोलताना म्हणाले की बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार घराघरा पर्यंत पोचवा आज घडीला समाजामध्ये परिर्वतन होने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले,यांची १०४ वी जयंती धनेगाव ता देवणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अण्णा भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी गावातील नागरिक ,शालेय मुलांनी गर्दी केली होती डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी लहान विद्यार्थीने मनोगत व्यक्त केल आहे,अण्णाभाऊ साठे समाज मंदीरा समोर जयंतीचा ध्वजारोहण युवा नेते रामलिंग शेरे उपसंरपच यांच्या हस्ते करण्यात आले या जयंती समीतीचे मुख्य मार्गदर्शक गोकूळ दंतराव, प्रमुख वक्ते लक्ष्मण रणदिवे, प्रणव बिरादार, जयंती समीतीचे अध्यक्ष हुसेन तुरे, भरत दंतराव उपाध्यक्ष, गोकूळ दंतराव, आकाश दंतराव, गोविंद दंतराव, प्रकाश गायकवाड, आनंद गायकवाड, प्रतिक गायकवाड, अमोल गायकवाड, माधव हारणे, रेखा दंतराव, उषा दंतराव, रुपाली दंतराव, हौशाबाई दंतराव, कांताबाई दंतराव, उतमाबाई दंतराव, राधा दंतराव यांच्यासह गावातील नागरिक ,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
