उदगीर : श्रावण सोमवार निमित्त येथील किल्ल्यातील उदागिर महाराज मंदिरात इंजि.विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत पहाटे अभिषेक करण्यात आला आणि दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .
श्रावण महिन्यातील चौथा सोमवार दि. २६ रोजी येथील प्रसिद्ध अशा उदागिर महाराज मंदिर येथील महादेवाला इंजि.विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन चे अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या हस्ते अभिषेक आणि महाआरती करण्यात आली . दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले .
श्रावण सोमवार असल्याने भाविक भक्तांनी किल्ल्यातील मंदिरात भल्या पहाटेपासून गर्दी केलेली होती . पहाटे आरती वेळी श्री किरण महाराज यांच्या उपस्थित व भक्तासोबत विश्वजीत गायकवाड यांनी महाआरती केली . यावेळी आशिष गुरधाळे,अक्षर जेवरीकर,विशाल हाळीकर,जय सोनावणे,अनिल मस्के,गौरव हनवंते,आकाश धोत्रे,अमर देडे,यश शिंदे,ऋषी लांडगे,सूर्यभान कांबळे,माधव सूर्यवंशी,वैभव गुप्ता,विराट हलीकर,युवराज शिंदे,आदित्य मादळे, अल्केश वाघमारे,विलास भंडे
कुलदीप शिंदे, गोविंद कांबळे, संदेश गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते .

