देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
कीटकनाशके फवारणी करते वेळेस खबरदारी व उपायोजना बाबत मार्गदर्शन.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा "आत्मा" योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बांधावरती, प्रशिक्षण, सहली, अभ्यास दौरे परसबाग भाजीपाला योजनेअंतर्गत भाजीपाला बियाणे वाटप किट, किसान गोष्टी , लुप्त होत चाललेल्या आरोग्यदायी रानभाज्यांच्या "रानभाजी महोत्सव" शेतकरी सन्मान कार्यक्रम ,जिल्हा कृषी महोत्सव इत्यादी माध्यमातून प्रभावी योजना राबविल्या जात जात आहेत व कृषी विभागाचे खरे तंत्रज्ञानाचा प्रसार आत्मा च्या माध्यमातून होत आहे. या अंतर्गतच खरीप हंगाम २०२४ मधील सोयाबीन आणि तूर या पिकांच्या उत्पन्न आणि उत्पादन वाढीचे दृष्टीने प्रकल्प संचालक आत्मा श्री एस.व्ही. लाडके आणि प्रकल्प उपसंचालक श्रीमती बांगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तालुक्यातील अंबा नगर येथे आत्मा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी श्री एस.आर. पाटील आणि मंडळ कृषी अधिकारी श्री बी.एम.जाधव यांच्या नियोजनाने अंबा नगर येथे सोयाबीन आणि तूर टोकन या विषयावर शेतीच्या तिसऱ्या वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.अंबानगर येथील सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटातील २५ महिला शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि तूर पिकांच्या उत्पन्न आणि उत्पादन वाढीचे अनुषंगाने आत्मा योजने अंतर्गत सोयाबीन आणि तूर या विषयावर तिसऱ्या शेती शाळेमध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री राहुल जाधव यांनी उपस्थित महिला आणि पुरुष शेतकऱ्यांना आत्मा योजनेच्या वेगवेगळ्या शेतकरी उपयोगी योजनांची माहिती देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गावात स्थापित झालेल्या पन्नास हेक्टर क्षेत्रांच्या कट स्थापना माहिती व सदरील योजनेच्या अनुषंगाने वाटचाल याबाबत माहिती देऊन शेतीला शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय पशुपालन शेळीपालन पिठाची गिरणी इत्यादीच्या माध्यमातून महिलांनी घर खर्च सक्षम करून शेतीमध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यास हमखास प्रगती होते असे सांगून सध्या सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांच्या वाढीच्या अवस्थेबाबत माहिती देऊन कीटकनाशक फवारणी करते वेळेस घ्यावयाची काळजी व फवारणी करताना विषबाधा झाल्यास त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतीत सविस्तर माहिती देऊन प्रत्यक्ष फवारणी किट चे प्रात्यक्षिक दाखवून शेतकरी श्री सुरवसे यांना फवारणीची भेट म्हणून दिली. कीटकनाशके रोग नाशके यांच्या पॅकिंग वरील सर्व माहिती शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण वाचावी कारण कीटकनाशकावरील "लाल" रंग हा "अति विषारी"औषधाचा "निळा" रंग हा "मध्यम विषारी"औषधाचा "पिवळा" रंग कमी विषारी व "हिरवा" सौम्य विषारी असा अर्थ दर्शवतात व विषबाधा झालीच तर त्याच औषधांच्या कागदावरती "अँटीडोट" म्हणजेच उपाययोजना ही लिहिलेले असतात याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक श्री प्रियतम कारभारी यांनी सध्या सोयाबीन तूर मूग उडीद सध्या ४५ते ५० दिवसांचे असून या पिकावरती तंबाखू वरील पाणी खाणारी अळी, उंट अळी चक्रीभुंगा व काही प्रमाणात खोडमाशी इत्यादीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यासाठी बाजारातील उपलब्ध योग्य कीटकनाशकाची फवारणी करण्याबाबत शिफारस करून तुर पिकाला बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकाची अळवणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक अशी महाविद्यालय लातूर आणि मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे २१०रुपये प्रति लिटर याप्रमाणे मिळत असून सध्या पंचायत समिती च्या कृषी विभाग कडून बायोमिक्सचा निशुल्क पुरवठा करण्यात येत आहे याचाही शेतकरी लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच तुर पिकाच्या खुडणी बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पहिली खुडणी २५ व्या दिवशी दुसरी खुडणी ६५ व्या दिवशी तिसरी खुडणी ९० व्या दिवशी करून तुर पिकामध्ये हमखास उत्पादन वाढ शक्य असून तूर खुडणीसाठी बाजारात इलेक्ट्रिक मशीन्स उपलब्ध आहेत त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा याबाबत आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक श्री बी टी सूर्यवंशी यांनी कृषी विभागातील महाडीबीटी मागेल त्याला शेततळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड बांबू लागवड इत्यादी योजनाबाबत सविस्तर मार्गशीष करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सोयाबीन तूर टोकन शेती शाळेतील २५ महिला शेतकरी लाभार्थी यांना शेती शाळेच्या वेगवेगळ्या वर्ग दरम्यान सुलभता यावी यासाठी शेतकरी शेती शाळा किटचे वाटप हे याप्रसंगी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी सावित्रीबाई फुले शेतकरी गटाच्या अध्यक्ष कालींदा सुरवसे व गटातील महिला शेतकरी, त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी श्री रोटे, कृषी पर्यवेक्षक श्री बी टी सूर्यवंशी कृषी सहाय्यक श्री प्रियतम कारभारी, बी टी एम श्री राहुल जाधव एटीएम श्रीमती माया श्रीनमे व गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
