अण्णाभाऊंचे साहित्य फार मोठे आहे बहुजनाने आत्मसात करावे --अंकुश माने
वृक्षारोपण करून साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील लासोना येथे
साहित्यसम्राट डॉ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ व्या जयंती नेमित्य साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस ग्रामसेवक कुठे साहेब ,सरपंच धनराज मठपती, उपसरपंच अंकुश माने,जि.प.शाळा अध्यक्ष तुकाराम माने ,यांच्या हस्ते करण्यात आले डॉ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन उपसरपंच अंकुश माने यांनी बोलताना सांगितले की अण्णा भाऊंचे साहित्य लोकांनी वाचले पाहिजे आज आपल्यातले अंधश्रद्धा करून टाकून बहुजनांनी अण्णाभाऊंचा आदर्श घेणे फार महत्त्वाचे आहे विद्यार्थी घडले तरच आपण काहीतरी विकास करू शकतो असे बोलताना व्यक्त केले यावेळी,चेअरमन हरिभाऊ माने रास्त धान्य दुकान चेअरमन बाबुराव नारायण माने, धनराज मंटोळे, संजीव बापूराव माने, दिलीपराव धामणगावे, वसंतराव पाटील, आशा कार्यकर्ती- उषा प्रभाकर माने ,कोमल किशोर माने तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती ग्रामपंचायत कार्यालय लासोना साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले सर्व प्रतिष्ठित मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान माने यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा सुपरवायझर रेखा गायकवाड यांनी केले.
