देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील अंबानगर ता.देवणी येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप)अंतर्गत गाव बैठक पार पडली.सदर क्रॉपसॅप गाव बैठकीमध्ये सोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळी,हिरवी उंटअळी आणि यल्लो मोझॅक विषाणूजन्य रोग नियंत्रण,तूर पिकातील मर रोग नियंत्रण,मूग उडीद पिकातील तुडतुडे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी संचलित फवारणी पंप अर्ज ऑनलाईन करण्याविषयी माहिती दिली.त्यानंतर राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकास विशेष कृती योजना अंतर्गत नॅनो डीएपी,नॅनो युरिया निविष्ठा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.यावेळी नॅनो डीएपी,नॅनो युरियाचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन गावचे कृषि सहाय्यक श्री.पी.बी.कारभारी यांनी केले.सदर कार्यक्रमास मंतेश सुरवसे,युसूफ शेख,राजकुमार रोट्टे,सुधाकर रामनवार,राजकुमार पवार,अंगद वाघमोडे,भगवान वाघमोडे,कलीम शेख,सरदार शेख तर महिलामध्ये कालिंदा सुरवसे,पद्मिन कोंडगिरे,सविता सुरवसे,संगीता सुर्यवंशी इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
