उदगीर (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब जाधव यांची रिपाई मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आली आहे. यावेळी रिपाइंचे उदगीर तालुकाध्यक्ष प्रफुलकुमार उदगीरकर, युवक आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोज माणसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही निवड झाल्यामुळे बाबासाहेब जाधव यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
