देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी : गणेश महोत्सवानिमित्त गुरुवारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ लुल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यासह नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी आदित्य पाटील तर सचिवपदी गुंडप्पा कंटे यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष संजय पटणे, कोषाध्यक्ष महादेव मिटकरी, सदस्य मदन देवशेटवार, महादेव बिरादार, विजयकुमार लुल्ले, गोविंद म्हेत्रे, दीपक बिरादार, बाबुराव डोंगरे, कैलास पाटील आदींचा समावेश आहे.त्या निवडीबदल देवणी शहरात आनंद साजरा करण्यात आले,
