लातूर (एल.पी.उगीले) जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चोऱ्या, घरफोड्या आणि माला विषयी गुन्हे संदर्भात तपास मोहीम वेगवान करण्यात आली असून घरपोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला दोन लाख 52 हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी एका पान मटेरियल दुकानाच्या खिडकीची ग्रील कटरने कापून घरामध्ये प्रवेश करून खडा सुपारीची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे अज्ञात आरोपी विरुद्ध चोरी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. सदर पथकाला त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.
नमूद चोरीतील गुन्हेगार त्याने चोरलेला सुपारीचा मुद्देमाल विकण्यासाठी मुरुड ते कोडंगाव कडे जाणारे रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित आरोपीना ताब्यात घेतले.सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 16/08/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव दादा उद्धव चव्हाण, (वय 35 वर्ष, राहणार राजेशनगर, ढोकी पारधीपिढी, तालुका जिल्हा धाराशिव),रमेश उद्धव चव्हाण, (वय 27 वर्ष, राहणार राजेशनगर ढोकी पारधीपिढी तालुका जिल्हा धाराशिव). असे असल्याचे सांगितले.त्यांच्या ताब्यात असलेल्या टाटा सुमोची झडती घेतली असता त्यामध्ये खडा सुपारीचा मुद्देमाल मिळून आला. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह मिळून दीड महन्यांपूर्वी मुरुड मधील एका दुकानाचे खिडकीचे गज कापून चोरी केल्याचे व त्या गुन्ह्यामध्ये चोरलेला,त्याच्या हिश्याला आलेले खडा सुपारी चा मुद्देमाल असल्याचे कबूल केले
त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेला मुद्द्यमाल व गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो वाहन असा एकूण 2 लाख 52 हजार 400 रुपयाचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे मुरुड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत इतर आरोपी साथीदारांचा शोध सुरू आहे.
सदरचे गुन्हेगार हे सराईत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने व माहितीचे संकलन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, मोहन सुरवसे, प्रकाश भोसले, सुरेश कलमे, पोलीस चालक अमलदार प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
