देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील वडमुरंबी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी चैत्राली बाळासाहेब भोसले ही पाचवी शिष्यवृत्ती ग्रामीण परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे, तर याच विद्यालयातील आणखी तीन विद्यार्थी शिष्यवर्तीस पात्र ठरलेले आहेत यामध्ये संजीवनी परमेश्वर मामडे,अंबिका प्रशांत आंबेगावे, अबुबखर अहमद सय्यद,यांचा समावेश आहे.तसेच या जिल्हा परिषद शाळेमधून शिष्यवृत्ती पात्र समीक्षा महेश कळसे,वैभवी उत्तम बिजापूरे,रोहित शिवशंकर नागलगावे,कार्तिक संग्राम सूर्यवंशी.
असे एकूण आठ यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाडकर शिक्षण विस्तार अधिकारी शिरीष रोडगे केंद्रप्रमुख सदाशिव साबणे मुख्याध्यापक भरत निलेवाड सर आणि सरपंच गंगुबाई मोरे उपसरपंच संतोष बिरादार आणि या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिक्षणप्रेमी विद्यमान परमेश्वर गोपीनाथ मामडे आणि वडमुरंबीचे स्थानिक जेष्ठ पत्रकार माधवराव मुर्गे यांच्या वतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन या ठिकाणी केलेला आहे, याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन केलेला आहे.मात्र सर्वप्रथम वडमुरंबी जिल्हा परिषद शाळेला कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक भरत निलेवाड सर आणि पदवीधर शिक्षक बांधव आपली सेवा जे ज्ञानदान विद्यार्थ्यांना देत असताना प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेची उत्तंग गरुड भरारी घडविले आणि घडवित असल्याबद्दल सर्व पालकांमध्ये शिक्षक बांधवाचं पण कौतुक अभिनंदन आभार व्यक्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे.
