उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीकांत पाटील यांचा वाढदिवस उदगीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, विधीज्ञ पद्माकर उगिले, अजित पाटील राजूरकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सोपानराव ढगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, संचालक संतोष बिरादार, पंचायत समितीचे माजी सदस्य बबन धनबा, जळकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीनिवास एकुरकेकर, प्रा गोविंद भालेराव, सतीश पाटील मानकीकर, प्रीतम गोखले इत्यादी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
राजकारण करत असताना समाज कार्याला प्राधान्य देऊन श्रीकांत पाटील यांनी आजपर्यंत कार्य केले आहे. उदगीर मध्ये सामाजिक चळवळ म्हणून कार्य करणाऱ्या चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सर्वसामान्य माणसाला पर्यावरण चळवळीची जाण निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने गावोगावी कार्यक्रमाचे आयोजन करून कापडी पिशव्यांचे वाटप करताना प्लास्टिक वर बंदी घालण्याची मागणी केली होती. जी एक सामाजिक चळवळ आहे. तसेच गोरगरिबांना मदत करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. ज्या समाजाने आपल्याला प्रेम दिले, मोठे केले, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. ही जाणीव ठेवून मागील दहा वर्षापासून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यामुळे त्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याला गती यायला वेळ लागत नाही. त्यांच्या या सामाजिक जाणीव जपण्याच्या भूमिकेला साजेसे कार्य त्यांच्या मित्र परिवाराकडून केले जात आहे.
कोरोना काळामध्ये चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटप करणे असेल नाहीतर लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांना अन्नाचे पॅकेट देणे असेल, त्यामध्ये सतत अग्रेसर भूमिका श्रीकांत पाटील यांची राहिलेली आहे. लोकांच्या हितासाठी धडपडणारा एक युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख समाजामध्ये निर्माण झाली आहे. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून श्रीकांत पाटील यांची ओळख आहे. लोकांना मदत करत असताना कोणताही अहंकार किंवा मीपणा याची भावना त्यांच्यामध्ये कधीच दिसून येत नाही. समाजकारण करत असताना येणारे अडथळे आणि राजकीय हस्तक्षेप विचारात घेऊन स्वतः श्रीकांत पाटील यांनीच माजी राज्यमंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख, आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षातून सक्रिय कार्य करायला सुरुवात केली आहे.
काँग्रेस पक्षात प्रवेश करताच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पहिला प्रयोग म्हणून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेची जबाबदारी सोपवली होती. अनेक अडथळे आले असताना देखील विशेषतः उदगीर मध्ये दोन स्टेडियम असून देखील ऐनवेळी स्टेडियम उपलब्ध न झाल्यामुळे स्वतंत्र क्रीडांगण तयार करून, श्रीकांत पाटील यांनी अत्यंत देखणे असे नियोजन करत स्पर्धा यशस्वी करून आपल्या संघटन कुशल आणि कार्यतत्परतेची ओळख काँग्रेस पक्षश्रेष्ठींना करून दिली होती. त्यांच्या अशाच धडाडीच्या आणि आक्रमकपणे कार्य करण्याच्या शैलीमुळे युवकांमध्ये हा चेहरा चांगलाच लोकप्रिय होत आहे. त्यांची लोकप्रियता अशीच दिवसेंदिवस वाढत जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर पंचक्रोशीतील अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून, समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या या तरुण नेत्यांचा आदर्श समाजासमोर कायम राहवा म्हणून
सामाजिक जाणिवाजपत राष्ट्रीय कार्य म्हणून श्रीकांत पाटील मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा विडा उचलला आहे. त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाऊ वाटपाचा कार्यक्रमही त्यांच्या मित्रांनी हाती घेतला आहे. अशा पद्धतीच्या कार्यक्रमासोबतच गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यातही कार्य मित्र मंडळाच्या वतीने केले जात आहे हे अत्यंत कौतुकास्पद आणि इतर स्वयंसेवी संघटनांनी आदर्श घ्यावा असे आहे असे कार्य करण्यासाठी युवा नेते श्रीकांत पाटील यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
.jpeg)
