उदगीर, गरिबाला परवडेल व श्रीमंताला आवडेल असे उदगीर येथे बिदर रोडवर दुधीया हनुमानच्या बाजूला देविदास गोविंदराव चिखले यांचे कित्येक वर्षापासून झुणका भाकर केंद्र चालू आहे.हे झुणका भाकर केंद्र 19 फेब्रुवारी 2011 या दिवशी शिवजयंती निमित्त प्रसाद म्हणून झुणका भाकर केंद्र सुरू केल. यावेळी नागरिकांना झुणका भाकर मोफत वाटप करण्यात आल.यावेळी झुणका भाकर केंद्रावर भरपूर गर्दी पडली होती. दहा हजार भाकरी एका झपाट्यात संपले. बाहेर गावाहून येणारे मजूर, विद्यार्थी यांना जेवणासाठी कमीत कमी दरात झुणका भाकर मिळाले पाहिजे. यादृष्टीने दहा रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू केले. या शिवाय दुसरी कुठलीही समाजसेवा नाही. म्हणून या झुणका भाकर केंद्राकडे चिखले यांनी संपूर्ण लक्ष देण्याचे ठरवले. 22 मार्च 2019 ला देशावर अचानक संकट येऊन, कोरोनाची लाट आली. यावेळी संपूर्ण गाव शुकशुकाट झालेल होत. रोडवर एकही व्यक्ती दिसत नव्हता. बस सेवा नसल्यामुळे, विद्यार्थी व इतर बाहेरगावचे नागरिकांना जाण्यास वाहन नव्हते. लोक अन्न व पाणी म्हणून तरसत होते. यावेळी तत्कालीन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भरत राठोड, सरकारी डॉक्टर व पोलिसांचे सहकार्य घेऊन, एका चार चाकी खुल्या गाडीत जेवणाची व पाण्याचे सोय केली. स्वतः व कुटुंबाकडे कोरोनाच्या लाटेची परवा न करता गल्लीबोळात जाऊन, प्रत्येकांना खिडकीच्या द्वारे झुणका भाकर व पाणी पाजवण्याचे पुण्यकाम त्यावेळी चिखले यांनी केलेले आहे. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी पण अशाच पद्धतीने लोकांना अन्न व पाणी झुणका भाकर केंद्राच्या आधारे चिखली यांनी देण्याचे काम केले. आज तागायत तो झुणका भाकर केंद्राचा गाडा चालूच आहे. आज पाहिल्यास सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोरगरीब, शाळेचे विद्यार्थी, मजूर, अनेक श्रीमंत आणि गरीब लोक या झुणका भाकर केंद्राला भेट देऊन, अन्न सेवन करतात. खरे पाहिल्यास उदगीर शहरात उदगीर बाबाच्या कृपेने चिखले यांचे कार्य अप्रतिम व न विसरण्यासारखे आहे. चिखले यांच्या कार्याला उदगीर करांचा सलाम आहे. चिखले यांनी असेच काम वरचेवर करत जावे, अशी उदगीर करांची मागणी आहे. हे काम करत असताना चिखले यांनी वासल्य या केंद्राची स्थापना केली. या केंद्रामार्फत गोरगरीब गरजू लोक,वयोवृद्ध लोक, ज्या आई-वडिलांना मुलगा पहात नाही, आशा वयोवृद्ध लोकांना त्यांच्या कपड्याची, जेवणाची, औषध पाण्याची, औषधी गोळ्याची व्यवस्था या वासल्य केंद्राकडून केली जात आहे. तरी गरजू लोकांनी या वासल्य केंद्रास भेट देऊन, आपली स्वतःची व्यवस्था करून घ्यावे, असे वासल्य केंद्राकडून चिखले यांनी बोलताना शेवटी सांगितले.
