उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील देगलूर रोडवरील उदयगिरी फाईन लॉन्ड्रीचे मालक दिगंबर मच्छिंद्र पिंपळे यांनी ग्राहकाच्या खिशात मिळालेले 3100 रूपये देऊन, आपला प्रामाणिकपणा दाखवलेला आहे.उदगीर येथे देगलूर रोडवर सताळकर यांच्या दुकानात रहात असलेले दिगंबर मच्छिंद्र पिंपळे हे बरेच वर्षापासून उदयगिरी फाईन लॉन्ड्री चालवतात. परवाच ग्राहक सुनील गोविंद जाधव सरपंच शिरोळ जानापुर तालुका उदगीर यांचे कपडे धूत असताना त्यांच्या खिशात 3100 रुपये मिळून आले. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच सुनील गोविंद जाधव यांना बोलावून घेऊन, त्यांचे 3100 रुपये परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी पण त्यांनी अनेक ग्राहकाचे मिळालेले पैसे त्यांना बोलावून परत केलेले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाची शिकवण त्यांना त्यांची आजी व आजोबा यांच्याकडून मिळालेली आहे. या लॉन्ड्री बद्दल उदगीर शहरात कौतुकाचा व इमानदारीचा विषय बनलेला आहे.
