देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील देवणी शहरात व तळेगाव भो. नगरीत विविध उपक्रम राबवून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले. सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्राचा मोठा अनुभव गोरगरिबांना सतत मदतीला धावून जाणारे हसत हसत समाजातील बहुजनांच्या हितांचे प्रश्न सोडविणारे व प्रत्येक सामान्य माणसाचे काम करणारे व प्रत्येक व्यक्तीना माझेच आहेत. व अनेक योजना गावपातळीवर समजून सांगणारे या मनमिळाऊ स्वभाव असणारे मा.श्री. धनराज भंडारे साहेब तलाठी यांचे सत्कार तळेगाव गावच्या वतीने करण्यात आले. या वेळी कृष्णा इंगोले, रामभाऊ बिरादार, कृष्णा पाटील, दत्ता बिरादार, गोपाळ इंगोले, विकास बिरादार, कृष्णा माने, हणमंत जाधव, व्यंकटेश कुलकर्णी , सतेश बिरादार, प्रकाश कांबळे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच साहेबांनी सर्वांनी मला भरभरुन आशीर्वाद माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला त्याबदल आभार व्यक्त केले. व सदैव मी तुमच्या सोबत आहे. असे सांगितले.
