देवणी प्रतीनीधी
बौद्ध समाज मंदिर चवण हिप्पगा येथे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी निमीत्य सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सौ शकंतुलाबाई मोरे व चेअरमन राम बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण डॉ अमोल विदयासागर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉ अमोल विदयासागर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल असे मार्गदर्शन केले व सायंकाळी ५ वाजता जयंती मोहोत्स समितीच्या वतीने भव्य मिरवणुकिचे उद्घाटन मा प्रमेश्वर कांबळे यांच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आले या वेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जवान नितीन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले जयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंगे उपाध्यक्ष तातेराव कांबळे सचिव श्रीधर कांबळे यांच्या सह जयंती समितीचे सर्व पदाधिकारी,आंबेडकर प्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते समाप्ती बौद्ध समाज मंदिर येथे करण्यात आली बिट जमादार देविदास किवडे साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आभार मुकेश कांबळे यांनी मानले
