देवणी प्रतिनिधी -- लक्ष्मण रणदिवे
देवणी -- एक शतकापूर्वी अंधाऱ्या अज्ञानी जगाने बाबासाहेब आंबेडकरांना नाकारले मात्र तेच बाबासाहेब मानवी कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग केले. आज जागतिक पटलावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महाशक्ती म्हणून उदय झाला ही भारतासाठी अभिमानाची बाब . देशातील कोणत्याच व्यक्तीला शिक्षण, राजकारण, महिला, विद्यार्थी, शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता संविधान रूपाने घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना फक्त जयंती दिवासी स्वीकारणे हे मोठे अज्ञान आहे. महान घटना निर्माते, अर्थतज्ञ , आदर्श संसदपट्टू, समाज सुधारक, जागतिक कीर्तीचा विद्वान, महिला उद्धारक , शेतकरी - उपेक्षित दुबळ्यांचा आसरा असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील लोकांनी उद्धाराचा राजमार्ग म्हणून स्वीकारावा त्यातच देशाचे हित आहे असे अनमोल विधान ख्यातनाम वक्ते तथा विचारवंत डॉ शिवाजीराव देवनाळे यांनी आंबेगाव ता देवणी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त केले. सार्वजनिक जयंती कार्यक्रमाच्या सभेचे अध्यक्ष अभंगराव शिंदे तर प्रमुख मान्यवर म्हणून प्रज्ञा मंचवार अंकुश शिंदे, पोलीस कानिस्टेबल विजयकुमार शिंदे उपस्थित होते. श्रोत्यांना पुढे संबोधित करताना डॉ देवनाळे म्हणाले जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यापेक्षा शाळा - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या मौलिक पुस्तकांची भेट द्या. कारण वाचक पिढी उद्या देशाला वाचवणार आहे. एक दिवस जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांच्या समाज जागृतीचा अग्नी घरोघरी तेवत ठेवावा लागेल. देश आणि घटनेपेक्षा आम्ही मोठे नाही या विचारला बाळस आल्याशिवाय देशाचा विकास नाही हे सांगण्यास ते विसरले नाहीत. या प्रसंगी काठीकर पोलीस कानिस्टेबल विजयकुमार सूर्यवंशी, अंकुश माने, अभंग शिंदे, भुजंग चलवा यांनीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकला. यावेळी प्राचार्य नीलकंठ बोडके, व्यंकट नवलगिरे, व्यंकट शिंदे, मिलिंद शिंदे, अशोक शिंदे, प्रकाश शिंदे, पंचशीला शिंदे, नंदनी शिंदे, सुशील शिंदे, अभंग शिंदे, बब्रुवान शिंदे, प्रभू सूर्यवंशी यासह गावकरी मंडळी कार्यक्रमांस मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
