उदगीर (एल. पी.उगीले) येथील खाजगी शिकवणी क्लासेसचे सदस्य तथा निष्ठावंत कार्यकर्ते प्रा.लक्ष्मीकांत पाटील यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुछ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रा.अशरफ खान, बसवेश्वर पाटील, कपिल बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या अगोदर लक्ष्मीकांत पाटील हे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या व अतिशय प्रभावीपणे कार्य केल्याबद्दल त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी बढती देवुन न्याय देण्यात आल्याची चर्चा संपूर्ण उदगीर परिसरात चालू आहे. व त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
