अंतोदय लाभार्थ्याचे अंगठे घेऊन मिळत नाही साखर
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यात गेली पाच महिन्यापासून शासनाने दिलेले राशन दुकानात अंतोदय लाभार्थ्यांना साखर अद्याप भेटली नसल्यामुळे उपेक्षित लोककलावांत मजूर व निराधारांची पुनवर्सन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बिबीनवरे टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तहसील मार्फत जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठवले आहे या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष वसंत बिबिनवरे टाकळीकर, विठ्ठल पाटोळे देवणी तालुका अध्यक्ष, लक्ष्मण रणदिवे, आत्माराम गायकवाड, रोहित डोंगरे, महेरूनबी शेख देवणी तालुका अध्यक्ष, लक्ष्मीबाई सूर्यवंशी देवणी शहराध्यक्ष, गजानन गायकवाड अजनीकर, डी एन कांबळे, ज्ञानोबा सूर्यवंशी नेकनाळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच देवणी तालुक्यातील अंतोदय लाभार्थ्यांना साखर त्वरित नाही भेटल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे
