देवणी प्रतिनिधी:-
शासनाने सर्वसामान्याला सवस्त दराने वाळु मिळावी यासाठी प्रती ब्रास सहाशे रुपये दर जाहीर करुन प्रत्येक जिल्हात महसुल प्रशासनाने टेंडर काडुन काही लोकानां वाळु विक्री करन्याची परवानगी दिली आहे त्या प्रमाणे लातुर जिल्ह्यात मांजरा,व तेरना नदीवर काही लोकानां टेंडर देण्यात आले आहे नदी पात्रातुन बेसुमार वाळु उपसा होत आहे पण जिल्हयात कोठेही शासन दराप्रमाने कोणालाही वाळु मिळत नाही वाळु विक्रीचे दर हे महसुल प्रशासनाच्या कागदावरच आहे,
टेंडरवाले व बिगर टेंडरवाले हे आज वाळु सहा हाजार रुपये प्रती ब्रासने म्हणजे शासन दराच्या दहा पटीने खुलेआम दिवसा ढवळ्या विकत आहेत महसुल प्रशासन मात्र डोळे मिटून शांत बसल्याचे दिसते वाळु कुठे जाते हेच जनतेला कळत नाही हा प्रकार उजेडात आण्यासाठी शेतकरी सघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे कुणाला टेंडर दिले आहे किती वाळु उपसन्याची परवानगी दिली आहे कीती दराने विक्री करायची आहे ,प्रती व्यक्ती किती ब्रास वाळु द्यायच आहे वाळू डेपो कोठे आहे याचा ताळेबंद जाहीर करुन सामान्याची होणारी लुट थांबवावी तसेच बेकायदेशिर वाळु उपसा थांबवुन त्याच्यावर ताबडतोब कायदेशिर कारवाई करावी अन्यथा शेतकरी संघटना भविष्यात महसुल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची नोंद घ्यावी,निवेदनावर राजकुमार सस्तापुरे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना विवेक पाटील युवा जिल्हाध्यक्ष, गणेश पाटिल,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
