उदगीर (एल.पी.उगीले): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा राखत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के दिला आहे. विशेष म्हणजे यावर्षी उदगीर शहरातून शंभर टक्के निकाल देण्याचा मान अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाला मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात उर्दू माध्यमांच्या शाळेत एक अग्रेसर नाव अल-अमीन विद्यालयाचे आहे. विद्यालयातर्फे कला व विज्ञान दोन्ही शाखा चालविल्या जातात.
विज्ञान शाखेतून एकूण 52 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वी झाले. शेख उम्मे बरीरा अब्दुल जब्बार ही विद्यार्थिनी 80.50 गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विद्यालयातून प्रथम येण्याचा मानही याच विद्यार्थिनींने मिळविला आहे. शेख महेक असग़र या विद्यार्थिनीने 74.83 गुण मिळवून विद्यालयातून दुसरी आली आहे. 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 09 विद्यार्थी यशस्वी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेतून 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.05 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 22 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 09 विद्यार्थी यशस्वी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टाबरोबरच प्राचार्य सय्यदा आज़ेमा बेगम पर्यवेक्षक ग़ुलाम ग़ौस खान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल अल-अमीन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर इसाखान साहेब, सचिव माननीय शेख अकबर साहेब व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या प्राचार्या सयदा आज़ेमा बेगम, पर्यवेक्षक गुलाम ग़ौस खान, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी शुभकामना दिल्या.
[2:56 PM, 5/21/2024] Ugile Sir:
