Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपच्या मंत्र्याकडून फायदे लाटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला जनसंवाद यात्रा काढायचा अधिकार नाही -- निवृत्ती सांगवे

           उदगीर (प्रतिनिधी)  भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मंत्रीपद मिळवणाऱ्या संजय बनसोडे यांच्या मंत्रिपदाचा लाभ घेणारे आणि त्यांच्याच गाडीत फिरणारे काँग्रेसचे नेते आता जनसंवाद यात्रा काढून भाजपच्या विरोधात ओरड करण्याचा घाट घालत असले तरी, त्यांना जनसंवाद यात्रेचा नैतिक अधिकार नाही. अशा पद्धतीचा आरोप राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा एम आय एम चे मराठवाडा विभागाचे सचिव निवृत्तीराव सांगवे यांनी केला आहे.

 पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उदगीरचे काँग्रेसचे कित्येक नेते हे संजय बनसोडे यांच्या गाडीत फिरून आपला आर्थिक फायदा करून घेतात, इतकेच नाही तर तिरुपतीला जाऊन गाठीभेटी करतात. मग आता लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी संवाद यात्रा करायची गरज काय? असा प्रश्नही सांगवे यांनी उपस्थित केला आहे. केवळ आणि केवळ काँग्रेसचे नेते आणि लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे सर्वस्व समजले जाणारे दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना आम्ही फार चांगले काम करतो. हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे नाटक केले जात असेल तर, उदगीर ची जनता कदापि माफ करणार नाही. एका बाजूला जातीयवादी विचारधारा घेऊन चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत हात मिळवणी करणाऱ्या नेत्यांसोबत हात मिळवणी करायची, आर्थिक फायदे घ्यायचे आणि पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊन आम्ही जनतेच्या हितासाठी आंदोलन करणार आहोत. असे नाटक करायचे,हे उदगीरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी बंद करावे. आपल्या भूमिका स्पष्ट ठेवाव्यात. भोळ्या भाबड्या जनतेला फसवून राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नये. असे ठणकावून सांगतानाच जनतेने देखील अशा दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहनही निवृत्ती राव सांगवे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.