Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर- घुगे या कर्मचाऱ्यांचा मान आणि सन्मान वाढवणाऱ्या अधिकारी आहेत -- पंडित जाधव

उदगीर

    (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर - घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिताताई शिंदे, उपजिल्हाधिकारी टकले मॅडम, उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असताना देखील कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवण्याच्या उद्देशाने एक कर्तबगार मंडळ निरीक्षक म्हणून पंडितराव जाधव यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्याचा सल्ला जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम यांनी दिला. आणि प्रत्यक्ष शिबिराचे उद्घाटनही पंडितराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले, माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करून मॅडमनी आपली कर्मचाऱ्या बद्दलची संवेदनशीलता आणि सन्मान वाढवण्यासाठी ची भूमिका दाखवून दिली असल्याचे विचार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.