श्री. मनोहर रोहिदास लोहारे यांचा जन्म दि.२९ जून १९८३ रोजी बनशेळकी ता.उदगीर जि.लातूर येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एम.ए.,बी.जे.अँड एम.एस.पर्यंत शिक्षण घेतले.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या श्री.मनोहर लोहारे यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात नवा आदर्श निर्माण केला.पत्रकारितेतील पदवी प्राप्त लोहारे यांनी २००८ पासून पत्रकारितेला सुरुवात केली. सुरुवातीला दै. यशवंत नंतर काही काळ दै. महिला एकजूट आणि सध्या ते लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या दै. प्रतिव्यवहार या दैनिकाचे उदगीर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मनोहर लोहारे यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी विविध पदावर राहून त्या पदाला शोभेल असे कार्य केले.बनशेळकी येथे बालगणेश मंडळाचे ते काही काळ अध्यक्ष राहिले.त्यामाध्यमातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, सर्वरोगनिदान शिबिराचे त्यांनी आयोजन करून याचा फायदा गावातील लोकांना मिळवून दिला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सहा वर्षे प्रसिद्धीप्रमुख होते.तर काही काळ तंटामुक्त गाव समितीचे सचिव म्हणून त्यांनी चांगले कार्य केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे तंटामुक्त गाव समितीस २००२- ३ चा तृतीय पुरस्कार मिळाला.जि.प.प्रा.शाळा बनशेळकीचे शालेय समिती सदस्य म्हणून ही दोन वर्षे कार्य केले.त्या माध्यमातून शालेय पोषण आहार, पालक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनात सहभाग नोंदवला.
बसव ब्रिगेडचे तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. लिंगायत महासंघाचे तालुका प्रसिध्दी प्रमुख ही ते होते. लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी दिली.उदगीर मराठी पत्रकार संघाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. बनशेळकी येथे विविध सामूहिक कार्यक्रमात त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. बनशेळकी येथे आयोजित शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवात त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. भविष्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ते अग्रेसर राहणार आहेत. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देवूया !
