Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॅम रोड समता नगर येथे पोलीस चौकी उभारा-- प्रहारची मागणी

उदगीर (प्रतिनिधी)

शेतकी निवास जवळ डॅम रोड समता नगर कडे जाणारा रस्ता यात रेल्वे गेट आहे. आणि येथील रेल्वे गेट पडल्यानंतर किमान एक ते दीड तास येथे ट्राफिक जाम होत असते, हा रस्ता रहदारीचा असून येथूनच समता नगर, गोपाळ नगर, नालंदा नगर, शेळकी रोड, कृष्णा नगर व नेत्रगाव, येणकी, मानकी या गावाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. गेट पडल्यानंतर येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर खूप अडचण निर्माण होत आहे. येथील नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. गेट बंद झाल्यानंतर होणारी ट्रॅफिक किमान एक तास तरी कमी होत नाही, तसेच याच मार्गात आडत बाजार असल्यामुळे वाहनांची ये जा मोठया प्रमाणावर होत असते. अरुंद रस्ते व यात ऑटो चालकांची पुढे जाण्याची घाई, अशामुळे रस्ता जाम होत जातो. कित्येक वेळा पोलीस प्रशासनाला सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी  प्रशासनाने गांभीर्याने विचार करून व पाहणी करून या ठिकाणी किमान दोन ट्राफिक पोलिसांची नेमणूक करावी, किंवा कायमस्वरूपी पोलीस चौकी देऊन सहकार्य करावे. असे निवेदन देण्यात आले आहे.सदरील निवेदन देतेवेळी उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे,  शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे,  तालुका सचिव अविनाश शिंदे, तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी, शहर सहसचिव प्रशांत आडे,शहर संघटक संतोष बिरादार इत्यादी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.