Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माऊली ग्रुपच्या वतीने बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार

 उदगीर(एल.पी.उगीले) - येथील माऊली ग्रुपच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती, उपसभापती व संचालक मंडळासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

उदगीर येथे सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या माऊली ग्रुपच्या वतीने रघुकुल मंगल कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले व सर्व संचालक मंडळाचा सपत्नीक सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी मुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका लक्ष्मीबाई भोसले उपस्थित होत्या. यावेळी मंचावर बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील, प्रमोद पाटील, प्रा. शाम डावळे, अँड. पद्माकर उगीले, ज्ञानेश्वर पाटील, बालाजी देवकत्ते, मधुकर एकुरकेकर, जीवनराव पाटील, वसंत पाटील, संतोष बिरादार, जगदीश बाहेती, गौतम पिंपरे सह सिद्धेश्वर स. बँकेच्या माजी संचालिका प्रा. चंद्रकला रोट्टे, माऊली ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत डोईजोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन  करून करण्यात आले. प्रास्ताविकात डोईजोडे यांनी, माऊली ग्रुपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सत्काराला उत्तर देताना सभापती हुडे यांनी, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचेच काम करून त्यांची उन्नती साधू असे सांगितले. प्रा. डावळे यांनी, निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून पर्यावरण संरक्षणासाठी काम करावे, तसेच समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी. असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. मुळे यांनी, उदगीर शहरात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य केले जात असून त्यात माऊली ग्रुप अग्रेसर आहे. इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात साईराज कपील बिरादार, सर्वार्थ विजयकुमार कवठाळे, मनीष अनिल जानापूरकर, पल्लवी धोंडीराम बंडी, प्रथमेश प्रमोद पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी माऊली ग्रुपचे उपाध्यक्ष मनोहर पांचाळ, सचिव मनोज शिवनखेडे, विलास बोके, शिवाजी चिल्ले, शिवलिंग मठपती, शिवशंकर मठपती, विजय सजनशेट्टे, कपील बिरादार, संजय दुनगे, संतोष काळेकर, मनोहर मुळे, सौ. मिराताई डोईजोडे, सौ. कलावती हुडे, सौ. सरस्वती पांचाळ, सौ. शितल शिवनखेडे, सौ. सविता बोके, सौ. सुनिता चिल्ले, सौ. रत्नमाला मठपती, सौ. सुवर्णा सजनशेट्टे, सौ. भाग्यश्री बिरादार, सौ. कमल दुनगे, सौ. सोनाली काळेकर, सौ. छाया मुळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. संगीता मठपती यांनी केले. आभारप्रदर्शन भरत कोयले यांनी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.