Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपाच्या वतीने मोटारसायकल रॅली व जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

 उदगीर (एल.पी.उगीले) -मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये 9 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाचा लेखा जोखा गावा गावा पर्यंत व गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोंचवण्यासाठी दि.21 जून ते 30 जून पर्यंतचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 60 हजार कुटुंबापर्यंत पोंहचण्याचे उद्दीष्ठ असून मागील 9 वर्षाच्या काळात मोदी सरकारने कोण कोणते विकास कामे गावपातळीपर्यंत पोंहचवले, याची माहीती प्रत्येक कुटुंबाला द्यायची आहे. भारतीय जनता पार्टीला देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कार्यकाळात 3 वेळा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली व देशाचा खरा विकास केवळ भारतीय जनता पार्टीने केला. आत्तापर्यंत संघ व जनसंघाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी  घरची भाकरी खाऊन पक्ष जीवंत ठेवण्याचे काम केले. असा दावा करण्यात आला.

या अभियानाअंतर्गत सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीची तयारी असून सन 2024 मध्ये 350 च्या वर जागा निवडूण आणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याच्या उद्देशाने ललित भवन ते कॅप्टन कृष्णकांत चौक दरम्यान भाजपाची रॅली काढण्यात आली. 

रॅलीने उदगीरकरांचे लक्ष वेधून घेतले. यांनंतर जेष्ठ कार्यकर्त्यांची ओळख व्हावी, त्यांचे मार्गदर्शन लाभावे. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुभांकर हॉल, दंवडते कॉम्प्लेक्स येथे सुनील सावळे व शिवाजी भोळे यांच्यावतीने आयोजीत करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या सुरुवातील संयोजकाच्या वतीने सर्व जेष्ठ कार्यकर्त्यांचा व अधिकाऱ्यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड,माजी आ.सुधाकर भालेराव, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, शिवाजी भोळे,सुनील सावळे आदींच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खा. सुधाकर शृंगारे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदाण्णा केंद्रे, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र तिरुके, विक्रमकाका शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, आमोल पाटील, बसवराज पाटील कौळखेडकर, सुधीर भोसले, अमोल निडवदे, उत्तराताई कलबुर्गे, पंडितराव सूर्यवंशी, बस्वराज रोडगे, राजेंद्र केंद्रे, मनोज पुदाले, धर्मपाल नागरगे, शंकर रोडगे, बालाजी गवारे, शामल कारामुंगे, जया काबरा, उषा रोडगे, सरोजा वारकरे, साईनाथ चिमेगावे, रतिकांत आंबेसंगे, सुनील सावळे, लक्ष्मण जाधव, आनंद बुंदे, सावन पस्तापुरे शिवाजी भोळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

या संमेलनात ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब देशमुख, बाबुराव बिराजदार, प्रा चंद्रसेन मोहिते, घोणसे मामा, अविनाश रायचूरकर, डॉ प्रकाश येरमे, उमाकांत बुदे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड हे बोलताना म्हणाले की, जेष्ठ कार्यकर्त्याचा संवाद म्हणजेच आमच्यातील होत असलेल्या चुका सुधारण्याची संधी होय. आम्ही लहानपणापासून तुमच्या सहवासात वाढलो आहोत. संघ,जनसंघ, भाजपा, हे आमच्या रक्तात वाहत आहे.आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे कार्यकर्त्ते आहोत. आमचे कष्ट व निष्ठेमुळे आम्ही आता पदाचे सुख घेत आहोत. आम्हाला ही संधी मिळाली पण आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे आहे. यामुळे आम्हाला पक्ष व आपण जेष्ठ कार्यकर्ते जे आदेश द्याल त्याचे पालन आम्ही करू. व लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा बहुमताने निवडून आणू. असा विश्वास सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून देतो असे आश्र्वासन दिले. 

कार्यक्रमाच्या शेवटी माजी आ.सुधाकर भालेराव यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, आमचे भाग्य आहे की या संवाद कार्यक्रमामुळे आपल्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला. आपले मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभण्याची आवश्यकता आहे. आपल्या आशीर्वादामुळे उदगीर मतदारसंघाला तीन वेळेस आमदार मिळाले, यात मला दोन वेळेस संधी मिळाली. यामुळे मी तुमचा ऋणी आहे. पक्षाचा जो आदेश असेल त्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे. व यापुढे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.  येणाऱ्या सर्व निवडणूका ह्या भाजपाच्या विजयाच्या असतील असा दृष्ठ विश्र्वास देतो असे मत व्यक्त केले. या संवाद कार्यक्रमाचे आयोजन सुनील सावळे व शिवाजी भोळे यांनी अत्यंत सुंदर व भव्य केले, असे म्हणून त्यांचे कौतुक केले. 

या संवाद कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवाजी भोळे यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार राम जाधव यंांनी केले, सुनील सावळे यांनी आभार प्रदर्शनांनी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.