उदगीर -सुरेश बोडके
----------------------------------
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उदगीर येथे महान समाजसुधारक बसवेश्वर महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सामाजिक समता, न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बसवेश्वर महाराजांच्या विचारांना उजाळा देत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर केंद्रे, पोलीस हवालदार संतोष गेडाम, महिला पोलीस अमलदार हेमा हनुमंते, संध्या जोशी तसेच पोलीस अमलदार राहुल गायकवाड, नितीन बेंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शिकवणीचा आजच्या काळात असलेला महत्त्वपूर्ण संदर्भ अधोरेखित केला. जात-पात, भेदभाव यांना विरोध करून समानतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांची समाजाला आजही गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “काय काम करतो यापेक्षा कसे करतो हे महत्त्वाचे” हा त्यांचा संदेश पोलीस दलासाठी प्रेरणादायी असल्याचेही सांगण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उदगीर येथे आयोजित या कार्यक्रमाद्वारे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि नागरिकांप्रती संवेदनशीलतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखताना मानवी मूल्यांचे जतन करणे हीच खरी बसवेश्वर महाराजांना आदरांजली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले
