Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एकंबेकर महाविद्यालयात दोन दिवशीय राष्ट्रीय बहुउद्देशाखीय कार्यशाळा संपन्न कै. बापूसाहेब पाटी

 


ल एकंबेकर महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने तसेच नॉलेज ब्रिज,शेवगाव आणि एज्युटेक कार्पोरेशन, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने  "E-Content Development and Use of AI for Effective Teaching and Learning"(ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड युज ऑफ ए.आय.फॉर इफेक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग) या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय बहुउद्देशाखीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. 

      सध्याच्या डिजिटल युगात अध्यापन -अध्ययन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) आणि ई- कन्टेन्टचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उस्फुर्त सहभाग नोंदविला. 

     कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षांनी संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे,प्राचार्य डॉ. हरिदास राठोड,संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुलाताई पाटील, डॉ.संतोष मुळे, डॉ.पी.आर.मोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर उपस्थित होते. 

     समारोप प्रसंगी आपल्या भाषणात डॉ.रामकिशन मांजरे यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर केल्यास अध्यापन अधिक परिणामकारक आणि विद्यार्थी केंद्रित होऊ शकते. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी नमूद केले. 

     या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर  कर्मचारी व आयोजन समितीने परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे आयोजन अर्थशास्त्र,इंग्रजी आणि हिंदी विभागाकडून करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक,शिक्षक व संशोधन विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा दाडगे यांनी केले तर आभार डॉ. बालाजी महाळकर यांनी मानले.समारोप कार्यक्रमासाठी प्राध्यापक,शिक्षक व संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.