Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मानवी हक्क अभियानाची पुनर्बांधणी करा --मा.मिलींदजी आव्हाड




गायरान भूमिहीन शेतमजूर मजूर अन्याय अत्याचारांच्या विरोधात मानवी हक्क अभियान संघर्ष करणार


देवणी लक्ष्मण रणदिवे


लातुर जिल्हा प्रमुख कार्यकर्ता बैठकीत संघटना प्रमुखांचे आव्हान.                                         मानवी हक्क अभियान ही संघटना शोषित,कष्टकरी,कामगार,महिला,बालके,व दुर्बल घटक यांच्या हक्क,आधिकारा साठी व त्यांना सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणारी संघटना असुन सर्व स्तरांवर संविधानाला आपेक्षीत असलेली मुल्य प्रस्थापित करणेचा या संघटनेचा उद्देश आहे.महाराष्ट्रातील अनेक भुमिहिनांनी गायरान जमीनीवर मेहनत करुन त्या जमिनी उत्पन्न निर्मितीच्या लायक करुन त्या जमीनीत पिकाचे उत्पादन करीत आहेत,व राष्ट्राच्या संपत्ती ही भर घालत आहेत मात्र त्या जमिनी त्यांच्या नावे नाहीत.गावठाण विस्तार योजना असताना त्या योजनांची तिस वर्षांपासून अंमलबजावणी करण्यात आली नाही,परिणामी बेघर भुमिहिनांनी शासकीय जमिनीवर घरासाठी अतिक्रमण करुन वास्तव्य केले आहेत,मात्र त्यांची घरं त्यांच्या नावावर नाहीत,दुर्बलावरिल आत्याचारात वाढ ही झाली आहे,आसे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणुकीसाठी मानवी हक्क अभियानाची मजबुत पुनर्बांधणी करा असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद उर्फ नाना आव्हाड यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्तेना केले, दुबळ्या जनास सोबत घेऊन प्रश्न सोडवणुकीसाठीची मागणी सनदशीर मार्गाने शासनदरबारी लावु धरा,आवश्यक असेल तर प्रशासन व सरकारच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलने चालवा असा संदेश ही त्यांनी यावेळी दिले, ही बैठक लातुर जिल्ह्यातील औसा येथे घेण्यात आली,या बैठकीस लातुर जिल्ह्यातील मानवी हक्क अभियानाचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते,या बैठकीस मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद आव्हाड उपस्थित होते हे विशेष आहे,या बैठकीत मानवी हक्क अभियानाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव,अनंत साळुंखे मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा अध्यक्ष, रणदिवे लक्ष्मण मानवी हक्क अभियान उपाध्यक्ष ,विलास भोसले मानवी हक्क लातूर जिल्हा उपाध्यक्ष, शिवराज गुरांळे मानवी हक्क अभियान निलंगा तालुका अध्यक्ष, ऋषिकेश जाधव मानवी हक्क अभियान उदगीर शहराध्यक्ष, बाबासाहेब थोरात,संकेत खंडागळे,सुंदर भिसे,झुंबर कांबळे, हरिभाऊ राठोड, कृष्णा पिंजरे, शेषेराव रणदिवे इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष अनंत साळुंखे यांनी केले होते तर या बैठकीतील उपस्थितांचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.