देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील बोरोळ येथील कै.यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शाळेच्या स्थापनेपासून आज तागायत पर्यंत कार्यरत असलेले सहशिक्षक शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले यावेळी. या त्रिमूर्ती यांचा सेवानिवृत्ती व सेवापुर्ती गुणगौरव सोहळा संपन्न झाला.सहशिक्षक बिरादार बालाजी पांडुरंग,घनपाठी विनोद गोविंदराव, व गुंजोटे वैजनाथ दत्तात्रेय यांनी स्वइच्छा निवृत्ती घेतली. या त्रिमूर्तींचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सहपत्नीक सत्कार व निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी याकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था सचिव शिवाजीराव संभाजीराव शेंडगे तात्या हे होते. व प्रमुख पाहुणे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तोगरीच्या प्राचार्य वंदना येरनाळे व उपप्राचार्य काळगापुरे गुणवंत, गट साधन केंद्राचे देवणी येथील साधन व्यक्ती वजनम राजेंद्र व जाधव राजकुमार,
प्राध्यापक सतीश क्षीरसागर, गुरु स्थळे शिवाजीराव शेंडगे विद्यालय भोपनी चे मुख्याध्यापक संतोष शेंडगे, प्राचार्य एस. एस शेंडगे, डॉक्टर सुजित शेंडगे, मुख्याध्यापक सुधाकर पाटील लासोनकर, मुकुंदराज विद्यालय विळेगाव मुख्याध्यापक बोडके मुरलीधर , जि प प्रशाला बोरोळ चे मुख्याध्यापक राठोड जी आर, उपसरपंच प्रमोद मनोहरराव पाटील माजी सरपंच ज्ञानेश्वर शेंडगे, दत्ता हुरूसनाळे, शेतकरी संघटनेचे युवा लातूर जिल्हा उपाध्यक्ष सत्यदेव गरड, कालिदासराव देवणे, राहुल बालुरे, संजय खुळे, सुंदर राज शिंदे इंजिनियर सोमवंशी अशोक, मुख्याध्यापक दत्तात्रेय पारवे, डॉक्टर रामेश्वर कदम, ह भ प दोडके मामा, प्रतापराव शेंडगे नरेंद्र घनपाठी, शार्दुल घनपाठी, सुनंदा घनपाठी, स्नेहल घनपाठी, सत्कार मूर्तीच्या पत्नी सुनिता बिरादार प्रतिभा घनपाठी विजयमाला गुंजोटेआनंद पाटील किरण बिरादार,अजित बिरादार व्यंकटेश गुंजोटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सह पत्नी सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रदीप पाटील व कांबळे मीनाक्षी यांनी केले. तर आभार प्रदर्शन व अध्यक्षीय समारोप सचिव शिवाजी शेंडगे यांनी मानले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
