देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे लाडकी बहीण योजनेचे ग्रामपंचायतीच्या वतिने जनजागृती मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.या योजनेच्या जनजागृतीसाठी महसूल विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ग्रामपातळीवर सरपंच यशवंत कांबळे, कामकाज समिती अध्यक्ष तलाठी बि,एम भडारे, सचिव ग्रामसेवक अनिल आवले,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे,अयोध्या सूर्यवंशी,सत्यवती रणदिवे सखी,शोभा रणदिवे,रंजना रणदिवे अशा कार्यकर्ती, रजित घाटगे यांच्या सहकार्याने महिला जनजागृती शिबिरात सहभागी झाले होते आजच्या मेळाव्यात १०० महिलांचे अर्ज प्राप्त झाले बाकी महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावे असे आवाहन किरण कोळपे गट विकास अधिकारी देवणी यांनी केले आहे.यावेळी कट्टेवार अशोक विस्तार अधिकारी प स देवणी,अनिल कांबळे राष्ट्रवादीचे नेते,संजय गरड,माधव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य,अजय गरड, तुकाराम रणदिवे, व्यंकट कानुरे, सोनू माकने, विठ्ठल गरड, नामदेव पसरकल्ले, माधव गिरी, भरत गिरी, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,
