Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मतदानदिन हा सुटीचा नाही जिम्मेदारी दाखविण्याचा दिवस,


मातृभूमी महाविद्यालय मार्फत मतदार जनजागृती


उदगीर (एल.पी.उगीले):- येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित कस्तुराबाई नर्सिंग स्कूल आणि मातृभूमी महाविद्यालय मार्फत नवमतदार विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती फेरी मतदानाच्या आदल्या दिवशी काढण्यात आली. या फेरीत ०७ मे हा दिवस सुट्टीचा नसून जिम्मेदारीचा आहे, सर्व मतदारांनी अवश्य मतदान करावे आणि आपली जिम्मेदारी पूर्ण करावी. असे आवाहन करणारे फलक दाखवीत विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली .

   मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी असणारी सुट्टी ही प्रत्यक्षात आपल्याला जिम्मेदारी दाखवणारी असून या दिवशी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, आणि त्यानंतर आपली सुट्टी साजरी करावी. असे सुचविणारे फलक घेवून नव मतदारांनी जनजागृती काढली . 

यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी उस्तूरे ,प्राध्यापक बिभिशन मद्देवाड  ,रेखा रणक्षेत्रे, आकाश राठोड ,दीपक कल्याणी , नवनाथ पंदे, बालाजी जगताप  यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.