उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी रमेश काकडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच व्यासपीठावर उपस्थित जेष्ठ शिक्षक संजय देबडवार, भारत खंदारे, अविनाश घोळवे, शैलजा रोडगे तसेच उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य व संस्था पदाधिकारी यांनी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याची माहिती प्राध्यापक खंदारे भारत व ज्येष्ठ शिक्षक नारायण कांबळे यांनी महात्मा बसवेश्वर यांचा कायक वै कैलास - कर्म, कर्तव्य हेच स्वर्ग आहे, भूतदया ( प्राणीमात्रावर दया करा ), परोपकार करा, सर्वांशी प्रेमाने वागा इत्यादी संदेश सर्वांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य शैलजा रोडगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
